Join us

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल  

By सचिन लुंगसे | Updated: May 24, 2024 22:09 IST

Local Block on Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक असेल.

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक असेल. सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. पुढे ठाणे स्थानकांवर डाऊन स्लो मार्गावर वळवल्या जातील. लोकल १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी / वडाळा रोडवरून सुटणारी वाशी / बेलापूर / पनवेल डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी वांद्रे / गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद असेल. पनवेल / बेलापूर / वाशीहून सुटणारी सीएसएमटीसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीसाठी गोरेगाव / वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०.४५ ते ५.१३ वाजेपर्यंत बंद राहील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. ब्लॉकपूर्वी शेवटची टिटवाळा लोकल सीएसएमटीवरून सकाळी ९.५३ वाजता सुटेल.ब्लॉकनंतर पहिली कल्याण लोकल सीएसएमटीहून दुपारी ३.१८ वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी १०.२२ वाजता सुटेल.ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटीहून दुपारी ४.५१ वाजता सुटेल.ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटीहून ४.५६ वाजता वांद्र्यासाठी सुटेल. सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेलहून सकाळी ९.४० वाजता सुटेल.सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेलहून दुपारी ३.२८ वाजता सुटेल.सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगावहून दुपारी ४.५८ वाजता सुटेल

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई उपनगरी रेल्वेमुंबई