Join us  

समर व्हेकेशन यंदा ‘फेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:51 AM

राज्यात आणि देशात एकूणच लोकसभेच्या निवडणुकांमुळे सगळ्याच परीक्षांवर परिणाम झाला. मुंबई विद्यापीठासह इतर अनेक विद्यापीठांनीही निवडणुकीदरम्यान येणाऱ्या आपल्या परीक्षा आणि त्यांचे नियोजन पुढे ढकलले.

- सीमा महांगडेराज्यात आणि देशात एकूणच लोकसभेच्या निवडणुकांमुळे सगळ्याच परीक्षांवर परिणाम झाला. मुंबई विद्यापीठासह इतर अनेक विद्यापीठांनीही निवडणुकीदरम्यान येणाऱ्या आपल्या परीक्षा आणि त्यांचे नियोजन पुढे ढकलले. मात्र या साºयाचा फटका बसला तो विद्यार्थ्यांना. विशेषत: जे विद्यार्थी परीक्षा संपवून उन्हाळी सुट्टीत बॅगा पॅक करून सुट्टी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये होते, त्यांचे प्लॅनिंग तर हवेत विरले आहे.उन्हाळी सुट्टी म्हणजे वर्षभराच्या रुटीनमधून काढलेली राखीव सुट्टी असते. विद्यार्थ्यांसाठी तर कॉलेज, अभ्यास, प्रोजेक्ट्स या साºया टेन्शनमधून मोकळा श्वास घेण्याची किल्ली म्हणजे उन्हाळी सुट्टी. मात्र यंदा परीक्षांच्या वेळापत्रकात खोडा पडला तो लोकसभा निवडणुकीचा. परीक्षा इतक्याच किंबहुना त्याहून अधिक निवडणुकाही महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नियमानुसार कॉलेजेस आणि विद्यापीठे यांची निवडणुकीदरम्यानची वेळापत्रके बदलली आणि परीक्षा आपसूकच पुढे ढकलल्या गेल्या. वेळापत्रक पुढे ढकलले गेल्याने अनेक महत्त्वाच्या परीक्षा कॉलेजेस आणि विद्यापीठांत अजूनही सुरूच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काच्या उन्हाळी सुट्टीवर मात्र गदा आली आहे; मात्र आता त्याला पर्याय नाही म्हणत विद्यार्थ्यांना ते स्वीकारावे लागले आहे. काही विद्यार्थी तर गावालाही गेले नाहीत.काहींना ट्रीपला जायचे म्हणून काढलेले तिकीट रद्द करावे लागले आहे. त्यामुळे खूप जण वैतागले आहेत. याविषयी बीकॉमच्या दुसºया वर्षाला असणारा प्रथमेश शिंदे म्हणाला, आमची परीक्षा निवडणुकांच्या कालावधीत अपेक्षित होती. मात्र यंदा निवडणुकांमुळे विद्यापीठाकडून नियोजन लांबले गेले. आता निवडणूक संपली असून लवकरच परीक्षेच्या नवीन नियोजनाप्रमाणे ती होईल. घरचे सगळे सुट्टीसाठी गावी गेले असले तरी माझी परीक्षा असल्याने मी इथे राहणे पसंत केले. परीक्षा झाल्यानंतर आता गावी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे यंदाच्या सुट्टीला मुकावे लागले आहे. खूप मूड गेला आहे. अशी परिस्थिती अनेकांची आहे.एकूणच उन्हाळी सुट्टी एकदा संपली की पावसाळा आणि नियमित सुरू होणारे नवीन शैक्षणिक वर्ष यामुळे उन्हाळी सुट्टीतील मजेवर यंदा तरी अनेक विद्यार्थ्यांना पाणी सोडावे लागले आहे.

टॅग्स :समर स्पेशलमुंबई