Join us

उन्हाळा सोसवेना; पक्ष्यांसाठी ठेवा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:06 IST

प्राणिप्रेमी संस्थांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशावर जाऊन पाेहाेचले असून, वाढत्या उन्हाळ्याने मुंबईकर ...

प्राणिप्रेमी संस्थांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशावर जाऊन पाेहाेचले असून, वाढत्या उन्हाळ्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. कमाल तापमानाचा फटका मुंबईकरांना बसत असतानाच मुक्या पक्षी आणि प्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याने दिलासा म्हणून शक्य असेल त्या जागी पक्ष्यांना पिण्याचे पाणी एखाद्या भांड्यामध्ये ठेवावे, असे आवाहन मुंबई शहर आणि उपनगरांत प्राणी आणि पक्ष्यांसाठी काम करीत असलेल्या संस्थांनी केले आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत पक्षी आणि प्राण्यांसाठी काम करीत असलेली ‘माणुसकी’ नावाची संस्था उन्हाळ्याच्या काळात तहानलेले मुके प्राणी आणि पक्ष्यांना पाणी पाजण्याचे काम करीत आहे. बोरिवलीच्या परिसरात काम करीत असलेल्या या संस्थेने मुंबईभर सर्वच नागरिकांना पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मुंबईचे कमाल तापमान सातत्याने वाढत आहे. ते ३४ अंशाहून ३८ अंशांवर पाेहाेचले असून, नागरिकांनी उन्हाळ्यात काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

........................