Join us

कर्जासाठीच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:24 IST

पत्नीच्या उपचारासाठी घेतलेल्या दोन लाखांचे कर्ज फेडण्यास दिल्या जाणाºया धमक्यांना कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी भांडुपमध्ये घडली.

मुंबई : पत्नीच्या उपचारासाठी घेतलेल्या दोन लाखांचे कर्ज फेडण्यास दिल्या जाणाºया धमक्यांना कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी भांडुपमध्ये घडली. याप्रकरणी धर्मा पाटील (३३), दीपक दुर्गा राजपूत(३३), रोशन सिंग (३४) या तिघांना अटक केली आहे.भांडुप परिसरात रवींद्र कदम (५०) कुटुंबियांसोबत राहयचे. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांनी पत्नीच्या उपचारांसाठी दोन लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम परत करताना त्यांना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे कर्ज देणाºयांकडून त्यांना धमकावण्यात येत होते. या कंटाळून मंगळवारी घरात कोणी नसताना त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळी दाखल झालेल्या भांडुप पोलिसांनी सुसाईट नोटही ताब्यात घेतली आहे.