Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या तणावातून आत्महत्या !

By admin | Updated: October 3, 2015 03:01 IST

गोरेगावमध्ये एका ५०वर्षीय महिला कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली

मुंबई : गोरेगावमध्ये एका ५०वर्षीय महिला कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या महिलेने लिहिलेली सुसाईड नोट गोरेगाव पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार कामाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तिने पाऊल उचलल्याचा तिच्या घरच्यांचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.अरुणा जोशी असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. अरुणा या गोरेगाव पश्चिमच्या सेजल पार्क येथील प्रभा अपार्टमेंटमध्ये कुटुंबासोबत राहत होत्या. बुधवारी जोशी यांनी बेडरूममधील पंख्याला बांधून गळफास घेतला. शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या त्यांच्या आई जेव्हा घरी आल्या, तेव्हा त्यांच्याकडील चावीने त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा अरुणा यांनी बेडरूम आतून लॉक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा दरवाजा उघडून पाहिला असता जोशी यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी ही माहिती जावयाला दिली. बेडरूममध्ये मिळालेल्या सुसाईड नोटनुसार कामाच्या तणावात आयुष्य संपवत असल्याचे अरुणा यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)