मुंबई : उत्तरप्रदेशमधील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी एमआयडीसी परिसरात घडली. सनी शर्मा (१९) असे या तरूणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधीच तो मामाकडे राहण्यासाठी आलेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सनी हा उत्तर प्रदेशच्या बनारस जिल्हयातील निझामगड गावातील राहणारा होता. दोन दिवसांपूर्वी तो मुंबईत मामाकडे राहण्यास आला होता. सनीचा मामा अंधेरी एमआयडीसीतील हनुमान चाळीत राहतो. रविवारी सकाळी सहा ते आठच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता कुपर रुग्णालयात पाठवल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम मंदागेंनी सांगितले. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही.
उत्तरप्रदेशमधील तरूणाची मुंबईत आत्महत्या
By admin | Updated: August 24, 2014 23:05 IST