Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायनमध्ये गोळी झाडून, तर नागपाड्यात उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:38 IST

सायन कोळीवाडा परिसरात गुरुवारी रात्री केतन पाटील (३१) या तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली

मुंबई : सायन कोळीवाडा परिसरात गुरुवारी रात्री केतन पाटील (३१) या तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली, तर नागपाडा येथे इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत श्वेता शहा (२३) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.सायन कोळीवाडा येथील भंडारवाडा परिसरात केतन पाटील हा कुटुंबासह राहतो. तो पानटपरी चालवतो. गेल्या काही दिवसांपासून तो घर खरेदी-विक्रीच्या व्यवसायात दलाल म्हणून काम करत होता. गुरुवारी रात्री त्याने गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक त्याने स्वत:वर झाडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याने आत्महत्या का केली, याची ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्याच्याकडील मोबाइल, गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला. मित्र, नातेवाईकांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.दरम्यान, शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास माहेरी आलेल्या श्वेता शहा या विवाहितेने मुंबई सेंट्रल एसटी डेपोजवळील कोठारी हाइट्स इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.