Join us

रुग्णालयाच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 05:59 IST

बॉम्बे रुग्णालयाच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेत, ६७ वर्षीय सतीश खन्ना या रुग्णाने गुरुवारी आत्महत्या केली.

मुंबई : बॉम्बे रुग्णालयाच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेत, ६७ वर्षीय सतीश खन्ना या रुग्णाने गुरुवारी आत्महत्या केली. आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.चेंबूरच्या खन्ना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या खन्ना यांना १५ जुलैला उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना गुरुवारी डिस्चार्ज मिळणार असल्याने मुलगा ती प्रक्रिया पूर्ण करीत होता. पत्नी औषधांची माहिती डॉक्टरांकडून घेण्यासाठी बाहेर गेल्या. त्याचवेळी रुग्णालयाच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून खन्ना यांनी आयुष्य संपविले. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.