Join us

सुपरवायझरच्या कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 6, 2015 00:57 IST

सलग १५ वर्षे नोकरी केल्यानंतर अचानक कामावरून कमी केल्याने व्यथित झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या केबीनमध्येच फिनॉल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठाणे : सलग १५ वर्षे नोकरी केल्यानंतर अचानक कामावरून कमी केल्याने व्यथित झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या केबीनमध्येच फिनॉल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संदीप बनसोडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ठेकेदाच्या अन्याय्य वागणुकीविरोधात संदीप याने कामगारांचे संघटन केले होते. त्यामुळे मागील महिन्यात त्याला ठेकेदाराने अचानक कामावरून कमी केले. या संदर्भात त्याने विनंत्या करूनही त्याला कामावर परत घेतले जात नसल्याने तो व्यथित झाला होता. शनिवारी सुपरवायझरने त्याला कामावर घेण्यास नकार दिल्याने संदीपने फिनॉल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.