मुंबई: छेडछाडीला कंटाळून १७ वर्षीय कॉलेज तरुणीने कॉलेजच्या गेटवरच विषप्राशन करून जीवनयात्रा संपविण्याची धक्कादायक घटना वडाळ्यात उघडकीस आली. मुथ्थुसेल्वी असे तरुणीचे नाव असून, सायन रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को कायद्यान्वये आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकर इलायराजा वेलपांडी (२३) याला अटक केली आहे.धारावी परिसरात कुटुंबासह राहणारी मुथ्थुसेल्वी ही वडाळ्यातील कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती. मुथ्थुसेल्वी हिचे वडील पच्चेमुथ्थू हे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्याकडे चालक म्हणून नोकरी करतात. या परिसरात राहणाऱ्या वेलंपाडी याचे तिच्यावर एकतर्फी होते. मात्र मुथ्थुसेल्वी ही त्याच्या प्रेमाला विरोध करीत होती. त्यामुळे वेलपांडीने तिचा पाठलाग करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्याशी जवळीक करण्यासाठी वेलपांडीने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली होती. सोनसाखळी परत हवी असेल तर तुला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावे लागतील, अशी धमकी वेलपांडीने मुथ्थुसेल्वीला दिली होती. ९ तारखेला मुथ्थुसेल्वीने विषप्राशन करून आत्महत्या केली. माटुंगा पोलिसांनी वेलपांडीला अटक केली आहे.
छेडछाडीला कंटाळून आत्महत्या
By admin | Updated: December 14, 2015 02:09 IST