Join us

साखर कारखान्यांकडे ७२ लाख घरपट्टी थकित-- लोकमत विशेष

By admin | Updated: August 5, 2014 23:34 IST

ग्रामपंचायतींवर कुरघोड्या : दहा कारखान्यांना राजकीय पाठबळ

अशोक डोंबाळे - सांगली .. जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींनी साखर कारखान्यांना चौरस फुटाने घरपट्टी आकारली नसल्यामुळे लोकलेखा समितीने जिल्हा परिषद प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत़ ठोक अंशदान पध्दतीने काही साखर कारखाने घरपट्टी ग्रामपंचायतींना देत आहेत़ पण, दहा साखर कारखान्यांनी राजकीय बळाचा वापर करून कर देण्याबाबत कुरघोड्यांचे राजकारण करत ७२ लाखांची घरपट्टी थकविली आहे़ ग्रामपंचायतींनी चौरस फुटाने घरपट्टी आकारल्यास साखर कारखानदारांची गोची होणार आहे़गावच्या क्षेत्रातील घरपट्टी ठरवून ती वसूल करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना आहेत़ एकदा घरपट्टी निश्चित केल्यानंतर तो नियम सर्वांना सारखाच लागू असला पाहिजे़ सामान्यांकडे घरपट्टी थकित असेल तर ग्रामपंचायत त्यांच्यावर कारवाई करते़ संबंधित कुटुंबाला ग्रामपंचायत कोणतेही दाखले देत नाही़ थकबाकीदाराला कोणतीही निवडणूक लढविता येत नाही़ मात्र एवढा कडक नियम सामान्यांना असेल, तर साखर कारखाने आणि त्यांच्या कार्यालयांना का नाही, असा प्रश्न शासनानेच उपस्थित केला आहे़ आठवड्यापूर्वी मुंबईत लोकलेखा समितीसमोर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांची साक्ष झाली़ त्यावेळी साखर कारखान्यांकडून घरपट्टी वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतींना का मदत करीत नाही, असा प्रश्न उपस्थित करून लोकलेखा समितीने ताशेरे ओढले. जिल्ह्यातील १८ साखर कारखाने आणि त्यांच्या कार्यालयाच्या इमारतींचे चौरस फुटाने मोजमाप करून घरपट्टी आकारण्यात यावी़ कारखाना प्रशासनाने अडथळा आणल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचनाही लोकलेखा समितीने केली आहे़ यामुळे साखर कारखान्यांच्या लाखो रुपयांच्या थकित घरपट्टीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे़जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांकडे २१ ग्रामपंचायतींची ७२ लाखांची थकित घरपट्टी आहे़  ही थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींनी एकत्रित प्रयत्न सुरु केले आहेत़ग्रामपंचायतकारखानाघरपट्टी मागणीवसुलीसाखराळे राजारामबापू१५००००१५००००वाटेगाव राजारामबापू४५०००४५०००सुरुल राजारामबापू४५०००४५०००वाळवाहुतात्मा५०२४७२़़़़़़़़कि़मग़डयशवंतराव मोहिते१५००००१५००००कारंदवाडीसर्वोदय५००००५००००क.महांकाळमहांकाली८२५०००६७५०००रांजणीमहांकाली६०००६०००रायगावकेन अ‍ॅग्रो२४१३६़़़़़़़़हिंगणगाव बु़केन अ‍ॅग्रो२४१३६़़़़़़़़वांगीसोनहिरा५००००़़़़़़़़अंबकसोनहिरा१५०००़़़़़़़़ग्रामपंचायतकारखानाघरपट्टी मागणीवसुलीकोकरूडनिनाईदेवी१,००,०००़़़़़़़़चिखलीविश्वास५,००,०००५,००,०००तुरचीतासगाव२०००००़़़़़़़़़आरगमोहनराव शिंदे२२५०००२२५०००कुंडलक्रांती३०००००३०००००घानवडयशवंत४८००००़़़़़़़़नागेवाडीयशवंत४०,०००४०,०००बामणीउदगिरी शुगर१३४१००़़़़़़़़कौठुळीमाणगंगा१०००००़़़़़़़़पुजारवाडीमाणगंगा३०००००़़़़़़़़राजेवाडीश्री श्री रविशंकर१५००००१५००००