Join us

उपनगरात पुरुषांपेक्षा महिला मतदार कमी

By admin | Updated: September 20, 2014 01:17 IST

उपनगरांतील 26 विधानसभा मतदारसंघांतील पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येची तुलना केली असता पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 7 लाख 84 हजार 389 ने कमी आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उपनगरांतील 26 विधानसभा मतदारसंघांतील पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येची तुलना केली असता पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 7 लाख 84 हजार 389 ने कमी आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच ही माहिती मिळाली असून, उपनगरांतील 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 76 लाख 56 हजार 975 मतदार आहेत. आणि त्यात पुरुष मतदारांची संख्या 42 लाख 2क् हजार 614 एवढी आहे, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 36 हजार 225 एवढी आहे.
मतदारांच्या संख्येत वाढ व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 16 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2क्13 या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत 3 लाख 16 हजार 9क्4 मतदारांची नोंदणी झाली होती, तर एप्रिल महिन्यात 2 लाख 6 हजार 269 मतदारांची नोंद झाली होती.
लोकसभा निवडणुकीनंतरदेखील मुंबईच्या उपनगरांत विशेष मोहीम हाती घेतली होती. यात 1 लाख 39 हजार 264 नवीन मतदारांची नोंदणी झाली. अशा मोहिमेंतर्गत आतार्पयत 6 लाख 62 हजार 4क्7 मतदारांची नोंदणी झाली. लोकसभा निवडणुकीवेळी उपनगरांतील 38 लाख 49 हजार 9क् पुरुष आणि 31 लाख 15 हजार 948 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 118 इतर उमेदवारांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला होता. आजर्पयत नोंदणी झालेल्या इतर मतदारांची संख्या 136 आहे. (प्रतिनिधी)
 
विधानसभापुरुषमहिला
बोरीवली1,67,7371,56,799
दहिसर1,67,1311,44,826
मागाठाणो1,72,3291,34,क्66
मुलुंड1,54,3811,4क्,546
विक्रोळी1,36,1551,16,958
भांडुप1,66,19क्1,3क्,4क्4
जोगेश्वरी पूर्व1,56,2क्41,3क्,619
दिंडोशी1,73,9क्21,21,क्39
कांदिवली1,52,12क्1,18,6क्1
चारकोप1,73,4621,4क्,572
मालाड (प.)1,6क्,7क्51,36,956
गोरेगाव1,85,7941,48,4क्9
वर्सोवा1,63,24क्1,31,257
अंधेरी (प.)1,63,8881,43,4क्1
अंधेरी (पूर्व)1,56,6631,27,373
विलेपार्ले1,5क्,3611,33,356
चांदिवली2,44,3क्51,69,185
घाटकोपर (प.)1,67,7971,32,171
घाटकोपर (पू.)1,31,51क्1,14,786
मानखुर्द  1,8क्,7851,24,333
शिवाजीनगर
अणुशक्ती नगर1,56,5251,26,885
चेंबूर1,48,8381,27,856
कुर्ला1,62,3141,27,856
कलिना1,39,7521,11,764
वांद्रे (पूर्व)1,44,7741,17,285
वांद्रे (पश्चिम)1,43,7521,31,क्17