Join us  

हयातीचे दाखले १० मेपर्यंत सादर करा; मनपाचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:30 AM

मुंबई महानगरपालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 'हयातीचे दाखले' दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 'हयातीचे दाखले' दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. १ नोव्हेंबर २०२३ ते ५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणाऱ्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी १० मे २०२४ पर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालिका मुख्यालयातील लेखा अधिकारी विभाग येथे ऑफलाइन पद्धतीने दाखले सादर करावेत किंवा केंद्र शासनाच्या www.jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. प्रशासनाने निवृत्तीवेतनधारक, निवृत्तवेतनधारकांच्या हयातीच्या दाखल्यांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. 

१० मेपर्यंत हयातीचे दाखले ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने प्राप्त न झाल्यास मे २०२४ पासूनचे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट कुटुंब केले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका