Join us

कल्याणमध्ये तलावात बुडून पोलिसाचा मृत्यू

By admin | Updated: January 24, 2015 02:29 IST

वासिंदजवळील खातिवली-वेहळोली गावांच्या पाझर तलाव परिसरात पार्टीसाठी आलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एका पोलिसाचा बुडून मृत्यू झाला.

घातपाताचा संशयशहापूर : वासिंदजवळील खातिवली-वेहळोली गावांच्या पाझर तलाव परिसरात पार्टीसाठी आलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एका पोलिसाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. कल्याण येथील महात्मा फुले शहर पोलीस ठाण्याचे ५ कर्मचारी पार्टी करण्यासाठी गेले होते़ तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या भास्कर महादू हरड (५६, रा. मुरबाड) या हवालदाराचा बुडून मृत्यू झाला. मात्र सोबतच्या ४ सहकारी पोलिसांनी ही बातमी कुणासही न कळविता घटनास्थळावरून पोबारा केला. शुक्रवारी सकाळी याची माहिती कुटुंबीयांना कळल्यानंतर शहापूर पोलिसांच्या मदतीने गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र यश न आल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन तुकड्या बोलावण्यात आल्या. त्यांची अथक शोधमोहीम सुरू आहे. कॉन्स्टेबल हरड हे गुरु वारी दुपारी २.३० वाजता पोलीस स्टेशन कल्याण येथून सहकारी पोलिसांसोबत वासिंद येथे जाण्यासाठी निघाले. मुंबई-नाशिक महामार्गावरील वासिंद-खातिवली येथील हॉटेलात त्यांचे जेवण झाले. दुपारचे जेवण होऊनही पार्टीसाठी ते तलाव भागात का गेले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, घटनेनंतर सहकारी पोलिसांनी पळ काढल्याने व मोबाइल स्विच आॅफ करून ठेवल्याने हरड यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.