महाड : राष्ट्रीय काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडणुका पार पडल्या. बांधकाम समिती सभापतीपदी महमद आली पल्लवकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.आरोग्य समितीच्या सभापतीपदी डॉ. आदेश पाथरे, पाणीपुरवठा सभापतीपदी सुषमा यादव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नुपूर जोशी तर शिक्षण व नियोजन समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्षा गीता महाडिक यांचे एकमेव अर्ज आल्याने हे सर्व सभापती बिनविरोध निवडून आल्याचे प्रांताधिकारी सातपुते यांनी जाहीर केले.अन्य समिती सदस्यांमध्ये बांधकाम समिती सदस्य दिनेश जैन, सुरेखा चव्हाण, बिपीन म्हामुणकर, सार्वजनिक आरोग्य समिती सदस्य गजानन काप, निदेश जैन, सुरेखा कांबळे, दीपक सावंत, पाणी पुरवठा समिती सदस्य सुनील कविस्कर, गजानन काप, नीला मेहता, बिपीन म्हामुणकर आदी आहेत.
विषय समित्या निवडी बिनविरोध
By admin | Updated: December 23, 2014 22:26 IST