Join us

उप:या नेत्यांची फौज

By admin | Updated: October 5, 2014 00:50 IST

एकीकडे शिवसेनेसह प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे चांगलेच फावले आह़े, तर दुसरीकडे भाजपा कार्यकत्र्यासह संघ स्वयंसेवकांत तीव्र नाराजी पसरली आह़े

नारायण जाधव - ठाणो
मित्रपक्ष शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणो-पालघर जिल्ह्यांत विशेषत: शहरी भागांत फारशी ताकद नसलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून संघटनात्मक उभारी देण्यासाठी पक्षाने राज्यातील मातब्बर नेत्यांना नेमण्याऐवजी महाराष्ट्राबाहेरील उप:या नेत्यांची फळी नेमली आह़े यामुळे एकीकडे शिवसेनेसह प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे चांगलेच फावले आह़े, तर दुसरीकडे भाजपा कार्यकत्र्यासह संघ स्वयंसेवकांत तीव्र नाराजी पसरली आह़े
राजधानी मुंबईतून मराठी माणूस कधीच नजीकच्या ठाणो जिल्ह्यात स्थिरावला असताना त्याला आपलेसे करण्यासाठी मराठी नेत्यांना नेमण्याऐवजी भाजपा श्रेष्ठींनी दोन्ही जिल्ह्यांत ते लढत असलेल्या 24 पैकी 22 मतदारसंघांतही परप्रांतीय नेत्यांची फौज उभी केली आह़े
यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार, पेट्रोलियममंत्री धर्मेद्र सिंग, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, केमिकल आणि फर्टिलायझरमंत्री अनंत कुमार, हिमाचलचे प्रदेशमंत्री ठाकूर यांच्यासह उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातच्या आमदारांचा समावेश आह़े त्यांच्या सेवेकरिता 22 वॉररूमदेखील तयार केल्या आहेत़
जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह कट्टर भाजपा कार्यकत्र्याना न्याय देण्याऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने अन्य पक्षांतून आलेल्या आठ बंडखोरांना उमेदवारी दिली आह़े यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील भाजपा कार्यकर्ते आधी नाराज आहेत़ त्यातच आता उप:या नेत्यांची फौज प्रचारासाठी नेमल्याने कार्यकत्र्यात तीव्र असंतोष पसरला आह़े
जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभांसह शिवराजसिंग चौहान, 
मनोहर र्पीकर, राजनाथ सिंह, स्मृती इराणी या नेत्यांच्या सभा होणार आहेत. उत्तर भारतीयांची वस्ती असलेल्या भागांमध्ये राजनाथ सिंह यांचे रोड शो करण्याचेही नियोजन आहे. ब्राrाण, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय मतदारांना आकर्षिक करण्याची 
रणनीती केली असली तर शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादींवर प्रेम करणारा 
उपरोक्त समाजांतील मतदार आणि 
मराठी माणसांत भाजपाच्या 
या रणनीतीविषयी असंतोष पसरला 
आह़े
 
च्नितीन गडकरींसारख्या राज्यातील लोकप्रिय मराठी नेत्याच्या सभांना जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नसताना आता श्रेष्ठींनी नेमलेल्या या अमराठी नेत्यांना जिल्ह्यात कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत अनेक कार्यकत्र्यानी साशंकता व्यक्त केली़