Join us

यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी व यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी व यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

भिंवडीचे आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखालील यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाने वस्त्रोद्योगमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

यंत्रमागधारकांनी अस्लम शेख यांना दिलेल्या निवेदनात यंत्रमाग उद्योगाची परिस्थिती पाहता, किमान टाळेबंदी काळातील वीजबिलामध्ये सवलत मिळणे, यार्नचे भाव स्थिर ठेवणे, भिवंडीमध्ये कापड मार्केट, तसेच यार्न मार्केट उभारणे, ‘टीयूएफ’योजनेंतर्गत रिपेअर लूम लावलेले यंत्रमागधारकांच्या कर्जावरील व्याजास सवलत व भिवंडीमध्ये टेक्सटाइल पार्क निर्माण करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या. केंद्र शासनाद्वारे यंत्रमाग उद्योगाला चालना मिळावी, म्हणून आखण्यात आलेल्या योजनेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

येत्या एक ते दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये भिवंडी शहरातील वस्त्रोद्योगची पाहणी करण्यासाठी भागाचा दौरा करणार आहेत.

------------------------------------------