Join us

विद्यार्थ्यांनी दिली लोकमत प्रेसला भेट

By admin | Updated: December 7, 2015 01:22 IST

महापे येथील लोकमत वृत्तपत्राच्या प्रिंटिंगचे कामकाज जाणून घेण्यासाठी नॅशनल इंग्लिश स्कूल (कुडूस) वाडा, पालघर येथील विद्यार्थ्यांनी शनिवारी प्रिंटिंग प्रेसला भेट दिली

महापे येथील लोकमत वृत्तपत्राच्या प्रिंटिंगचे कामकाज जाणून घेण्यासाठी नॅशनल इंग्लिश स्कूल (कुडूस) वाडा, पालघर येथील विद्यार्थ्यांनी शनिवारी प्रिंटिंग प्रेसला भेट दिली. वृत्तपत्र तसे तयार होते, त्याची छपाई कशाप्रकारे केली जाते, यामागे किती विभाग कार्यरत आहेत, याबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावी, याकरिता शाळेच्या वतीने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील नववीच्या वर्गातील १०२ विद्यार्थ्यांनी या लोकमत वृत्तपत्राचे कामकाज जाणून घेतले, तसेच त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला उपयुक्त सर्व माहिती लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना दिली. एखादे वृत्तपत्र तयार होताना त्यामागे किती कर्मचारी काम करतात, त्यात किती विभाग असतात, वृत्तपत्र घरघरात कसे पोहोचविले जाते, बातम्या कशा गोळा केल्या जातात, विद्यार्थ्यांच्या या साऱ्या प्रश्नांचे निरसन या ठिकाणी करण्यात आले. लोकमत वृत्तपत्राच्या प्रिंटिंग प्रेसला भेट देऊन संपूर्ण प्रेसची पाहणी तसेच यंत्राविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनीही विद्यार्थ्यांना वृत्तपत्राविषयी माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचेही निरसनही या ठिकाणी करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सीमा सुरकर, उपमुख्याध्यापक अवेश धुरू, शिक्षक मिलिंद भाईर, क्रीडा शिक्षक अझार सय्यद आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.