Join us

कळंबोलीतील शाळेत विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 18, 2015 05:03 IST

कळंबोलीमधील सेंट जोसेफ शाळेत सातवीतील मुलाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७च्या सुमारास घडली.

पनवेल : कळंबोलीमधील सेंट जोसेफ शाळेत सातवीतील मुलाने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७च्या सुमारास घडली. विघ्नेश सतीश साळुंखे (१२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. कळंबोलीतील विघ्नेशला त्याचे वडील सतीश साळुंखे यांनी सकाळी शाळेत सोडले. मात्र अवघ्या काही मिनिटांतच त्यांना ही बातमी मिळाली. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने नजीकच्या सिंहसिटी रुग्णालयात येण्याचा निरोप त्यांना देण्यात आला. मात्र त्यानंतर विघ्नेशला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.साळुंखे एमजीएम येथे पोहोचल्यावर विघ्नेशला मृत घोषित करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझन शाळेमधील सहावीत शिकणाऱ्या गौरव कंक (११) याने आत्महत्या केली होती. त्यानंतर शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.