Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळांतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By admin | Updated: September 1, 2014 04:46 IST

शाळा सुरू होऊन तीन महिने उलटल्यानंतरही महापालिका शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश न मिळाल्याने लोकप्रतिनिधींनी शिक्षण मंडळाच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.

भार्इंदर : शाळा सुरू होऊन तीन महिने उलटल्यानंतरही महापालिका शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश न मिळाल्याने लोकप्रतिनिधींनी शिक्षण मंडळाच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.शहरात पालिकेच्या ३५ विविध माध्यमांच्या शाळा असून त्यात सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना पाठ्यपुस्तकापासून गणवेशापर्यंतचे सर्व साहित्यसुद्धा मोफत पुरवण्यात येते. हे साहित्य खरेदीसाठी पालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात २ कोटींची तरतूद केली असून चालू आर्थिक वर्षात सुमारे १ कोटी खर्च केला आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणामागे सरासरी सुमारे २० ते २५ हजार रु. दरवर्षी खर्च करीत असतानाही पालिका शाळांतील दर्जा घसरत असल्याचा आरोप सर्वच स्तरांतून होताना दिसून येतो.दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतरही विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्यासह गणवेश उशिराच मिळण्याची परंपरा मागील काही वर्षांपासून सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)