Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळाले शून्य गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 06:00 IST

मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणीत गोंधळ अजूनही सुरूच आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणीत गोंधळ अजूनही सुरूच आहे. निकालाचा धडाका लावल्याने गोंधळ वाढतच आहे. जाहीर झालेल्या काही निकालांमध्ये विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. पाचव्या सत्रातील परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे.एका विद्यार्थ्याला चार विषयात शून्य गुण आहेत. तर, काही विद्यार्थ्यांना ७ अथवा ९ इतके कमी गुण आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार फक्त एकच प्रश्न तपासल्याचे वाटते आहे.तिसरी डेडलाइनही हुकलीतिसरी डेडलाईनही चुकली आहे. ९.२१ टक्के उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरु पदांवर प्रभारी व्यक्तींची राज्यपालांनी नियुक्ती केली आहे. आता परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे प्रभारी संचालक दीपक वसावे यांच्या बदलीच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.