Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी राबविली दादर चौपाटीवर ‘स्वच्छता मोहीम’

By admin | Updated: September 13, 2016 04:38 IST

गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच मुंबई स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी सोमवारी आय.टी. एम महाविद्यालय आणि विद्यालंकार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान राबवत चौपाटी स्वच्छ केली.

मुंबई : गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच मुंबई स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी सोमवारी आय.टी. एम महाविद्यालय आणि विद्यालंकार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दादर चौपाटीवर स्वच्छता अभियान राबवत चौपाटी स्वच्छ केली. खारघर येथील आय.टी.एम. महाविद्यालय आणि वडाळा येथील विद्यालंकार महाविद्यालयाने सामाजिक भान जपत सोमवारी दादर चौपाटी स्वच्छ केली. गणपती विसर्जनानंतर चौपाटी परीसरात पसरणाऱ्या अस्वच्छतेमुळे मुंबईच्या किनाऱ्यांचे सौंदर्य कमी होऊ नये म्हणून या महाविद्यालयांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी चौपाटीवरील कचरा वेचला. बाप्पाला वाहिलेली फुले, फुलांच्या माळा असा कचरा वेगळा करुन त्यापासून खत निर्मिती करण्याचा निर्धार केला आहे. तर प्लास्टिक सारख्या अविटनशील वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावली. गणेश विसर्जनादरम्यान दिला जाणारा प्रसाद आणि फळांचे वाटप यावेळी विद्यार्थ्यांनी गरजूंना केले. तसेच गणेश मंडळाना भेट देत स्वच्छता, जलसंवर्धन, दुष्काळ याविषयांवरील पथनाट्य सादर करत सामाजिक प्रबोधन केले. (प्रतिनिधी)