Join us
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी करणा-या भामट्याला अटक

By admin | Updated: March 1, 2015 22:42 IST

रसायनी येथील रोहित चितळे हा नेहमीच आॅनलाइन राहून आपल्या मित्रांशी संवाद साधायचा, परंतु ते करीत असतानाच अचानकपणे एका विचित्र

मोहोपाडा : रसायनी येथील रोहित चितळे हा नेहमीच आॅनलाइन राहून आपल्या मित्रांशी संवाद साधायचा, परंतु ते करीत असतानाच अचानकपणे एका विचित्र प्रकाराने त्याचे लक्ष वेधले. आपल्याच नावाचे सेम टू सेम दुसरे एक बनावट अकांऊंट त्याने या साईटवर पाहिले. या विचित्र प्रकारामुळे रोहितने रसायनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. परंतु हा प्रकार सायबर गुन्ह्यांतर्गत येत असल्याने रसायनी पोलिसांनी सायबर क्राइम सेलची तांत्रिक मदत घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सायबर क्राइम सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी तपासाची चक्रे युध्दपातळीवर फिरवून भांडुप - मुंबई येथील निखिल मुकुंद मुणगेकर याचे असल्याचे समोर आले. मुणगेकर याला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)