Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओशिवऱ्यात चोरांचा पोलिसांवर चाकूने हल्ला

By admin | Updated: January 29, 2017 01:12 IST

दोघा पोलिसांना शिवीगाळ करुन चाकूने हल्ला करण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये एक हवालदार किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यासह तिघांना

मुंबई : दोघा पोलिसांना शिवीगाळ करुन चाकूने हल्ला करण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये एक हवालदार किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यासह तिघांना अटक केली आहे. शाकीर शेख मोहम्मद शाह (२२), हुसेन शेर मोहम्मद शाह (२५), त्याची पत्नी शाहीन ऊर्फ वर्षा (२३) अशी त्यांची नावे असून सना शाह ही साथीदार फरारी झाली आहे. त्यांच्या मारहाणीत अंधेरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संतोष लोखंडे किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शुक्रवारी मध्यरात्री लोखंडे आणि त्यांचे सहकारी मुजावर घरी जात असताना त्यांना चौघे शेकोटी पेटवून बसलेले दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी शकिर आणि हुसैनला चौकशीसाठी अंधेरी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र त्यांनी हुज्जत घालण्यास सुरवात केली. शाकीरने स्वत:जवळील चाकू बाहेर काढत लोखंडे यांच्यावर वार केला. त्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली. (प्रतिनिधी)