बेकायदा पार्किंगसाठी दहा हजार रूपये दंडाची आकारणी महापालिकेने रविवारपासून सुरू केली़ मुंबईतील २६ ठिकाणी ही कारवाई होणार आहे़ कारवाईच्या पहिल्याच दिवशी पालिकेने सुमारे लाखभर दंड वसुल केला आहे़ या कारवाईत पालिका अधिकारी व वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली़ काही ठिकाणी वाहने हटवून रस्ते मोकळे करण्यात आले़ लोअर परळ येथे अशाच प्रकारे अनधिकृत पार्किंगमधील वाहने हटवून रस्ता मोकळा करण्यात आला़ त्यातही मुंबईकरांनी या कारवाईचे स्वागत केले आहे़ या सर्वाचा आढावा ‘लोकमत’ने घेतला.
कारवाई सुरु झालेली ठिकाणेवरळी स्कीम क्रमांक ५२, लोअर परळ डिव्हिजन, मेटल बॉकस कंपनी, हिंद सायकल रोड.वाशिगंटन हाऊस, अल्ट्रामाऊंट रोड, डहाणूकर मार्ग.एल्को मार्केटजवळ, आईस फॅक्टरी गल्ली, वांद्रे पश्चिम.साकीविहार रोड, तुंगे गाव, कुर्ला पश्चिम.साकी चांदिवली फार्म रोड, बुमरँग इमारतीजवळ, कुर्ला पश्चिम.टोपीवाला मार्केट इमारत, गोरेगाव रेल्वेस्थानक पश्चिम.वन इंडिया बुल सेेंटर, ज्युपीटर मिल, सेनापती बापट मार्ग, लोअर परळकोलेकल्याण कलिना, सीएसटी रोड, सांताक्रुझ.लोढा एक्सेलस, अपोलो मिल कम्पाऊंड, एन.एम.जोशी मार्गचूनवाल ग्रीन जीएमएलआर रोड, नाहूर गाव (प)एम.जी.एम हॉस्पीटल, परळ शिवडी विभागसीएसटी रोड, सांताक्रुझ (पू) च्एल. बी. एस. मार्ग, मुलुंड (प)कांजूर गाव, कांजूरमार्ग (पू) च्मलबार कुमबाला हील विभागविश्वेश्वर रोड, गोरेगाव (पू)विनामूल्य पार्किंगजय प्रकाश रोड,ओशीवारा मेट्रो स्टेशन, अंधेरी (प)विक्रोळी व्हिलेज,एल. बी. एस. रोड, विक्रोळी (प)हब मॉल, प. दु्रतगती महामार्ग, गोरेगाव (पू.)सेनापती बापट मार्ग, मुंबई मिल,लोअर परळ डिव्हिजनपंडित जवाहरलाल आणि मदन मोहन मालविया रोड, मुलुंड (प.)सेनापती बापट मार्ग, कमला मिलजवळ, लोअर परळ.
लवकरच सुरु होतीलपरळ शिवडी डिव्हीजनओशिवरा व्हिलेज, ओशिवरा लिंक रोड, अंधेरी (प.)देवीदास लेन, बोरीवली (प)
वाहनतळाबाबत नागरिक अनभिज्ञघाटकोपर : चेंबूरमध्ये चार वाहनतळांची गरजचेंबूरमध्ये बाजारपेठ परिसर आहे, येथे खरेदीसाठी लोकांची गर्दी असते, परंतु वाहनतळाची व्यवस्था नाही. या ठिकाणी चार वाहनतळांची आवश्यकता असल्याचे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.तर घाटकोपर येथील आरसीटी मॉलसमोर वाधवा इमारतीत पालिकेला पार्किंगसाठी जागा देण्यात आली आहे. डिसेंबरपासून हे वाहनतळ खुले करण्यात आले असून, मोफत आहे, परंतु याबाबत नागरिकांना माहितीच नाही. या वाहनतळामध्ये एका वेळी १००० वाहने उभी केली जाऊ शकतात. मात्र, दररोज केवळ ७० ते ८० वाहने उभी केली जातात, असे एका पालिका अधिकाºयाने सांगितले. या वाहनतळावर वीज आणि पाण्याची सोय नाही, त्यामुळे तेथे काम करणाºया कर्मचाºयाची गैरसोय होते, तसेच येथे वीज नसल्याकारणाने रात्री सुरक्षा रक्षक थांबविता येत नाही. त्यासोबत वाहनतळाच्या शटरची दुरवस्था झाली आहे. परिणामी, रात्री वाहने उभी केली जात नाहीत. बºयाचदा वाधवा इमारतीतील सुरक्षा रक्षक वाहनांना आतमध्ये जाऊ देत नाहीत. दोन-तीन महिन्यांपूर्वी येथे मोफत पार्किंग बंद करण्यात आली होती, असे एका रहिवाशाने सांगितले.