मुंबई : लोकल अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवता यावे यासाठी लोकलच्या मालडब्यात मध्य रेल्वेकडून स्ट्रेचर बसवण्यात आले. मात्र हे स्ट्रेचर दोन दिवसांत बसवताच चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या सात लोकलमध्ये मालडब्यात दोन दिवसांपूर्वी एकूण १४ फोल्डिंगचे स्ट्रेचर बसवण्यात आले आहेत. सीएसटी ते कल्याण धावणाऱ्या या लोकलमध्ये हे स्ट्रेचर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले होते. मात्र यातील ३ स्ट्रेचर चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिवसभरात या ट्रेन धावल्यानंतर रात्री कुर्ला कारशेडमध्ये येत असत. मात्र रविवारी कारशेडमध्ये आल्यानंतर तीन स्ट्रेचर काढून नेण्यात आल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांचा निदर्शनास आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
लोकलमधील स्ट्रेचर दोन दिवसांत गायब
By admin | Updated: August 26, 2014 01:57 IST