टीम लोकमत - मुंबई
मुंबईच्या रस्त्यांवरील अभ्यासिकांमध्ये रात्रीच्या वेळेत विद्यार्थी अभ्यास करीत असतात असे नाही, तर अगदी सकाळपासूनच येथे विद्यार्थी असतात़ केवळ जेवण व नाश्त्यासाठी घरी जाऊन विद्यार्थी येथे अभ्यासासाठी तळ ठोकून असतात़ अशा ठिकाणांचा दुसरा एक फायदा असा, की येथे ग्रुप स्टडी चांगल्या प्रकारे करता येतो़ गणित असो व अकाउंट विषय येथे ग्रुपने शिकला जातो व शिकवला जातो़
या अभ्यासिकांना वेळेचे बंधन नसल्याने अगदी पहाटे तीन ते चार वाजेर्पयत विद्यार्थी येथे अभ्यास करतात़ परीक्षा जवळ आल्या की येथील विद्याथ्र्याची गर्दी वाढत़े पण एकमेकांना त्रस होईल किंवा जाणीवपूर्वक त्रस दिला जाईल, असे प्रकार येथे होत नाहीत़ त्यामुळेच गेली अनेक दशके या अभ्यासिका यशस्वी विद्यार्थी घडवत आहेत.
यातील प्रचलित अशी अभ्यासिका म्हणजे वरळी येथील पोद्दार गल्ली़ या गल्लीत स्ट्रीट लाइटच्या उजेडात विद्यार्थी अभ्यास करतात़ हे विद्यार्थी केवळ दहावी किंवा बारावीचे असतात असे नाही,तर पदवी व त्यापुढील अभ्यासक्रमांचे विद्यार्थी देखील येथे रात्री उशिरार्पयत अभ्यास करतात़ या ठिकाणी केवळ वरळीतीलच विद्यार्थी अभ्यासासाठी येतात असे नाही, तर अगदी प्रभादेवी येथील विद्यार्थीही येथे अभ्यासासाठी येतात़
दुसरे ठिकाण म्हणजे नायगाव येथील पोलीस हुतात्मा मैदानाच्या बाजूचा रस्ता व तेथून पुढील असलेल्या दत्ताचे मंदिर परिसरात विद्यार्थी अभ्यास करीत असतात़ येथेही नायगावसह शिवडी, भोईवाडा व परळ येथील विद्यार्थी अभ्यासासाठी येतात़ महत्त्वाचे म्हणजे येथे पोलीस मुख्यालय असल्याने विद्याथ्र्याना अभ्यासासाठी ब:यापैकी शांतता मिळत़े पण आता येथे पत्त्यांचा जुगार आणि गर्दुल्ल्यांचा वावर अधिक वाढला आहे.तरीही विद्याथ्र्याची संख्या काही कमी झालेली नाही़ मात्र येथील जुगारी व गदरुल्ल्यांवर कारवाई व्हावी, एवढीच विद्याथ्र्याची इच्छा आह़े
माटुंगा येथील पाच उद्यान व वडाळा येथील एका उद्यानातही विद्यार्थी अभ्यासासाठी बसलेले असतात़ येथे आजूबाजूच्या परिसरात अनेक महाविद्यालये असल्याने सकाळी व दुपारच्या वेळेत बहुतांश विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येतात़
मुंबईत रस्त्यावरच्या अनेक अभ्यासिका आहेत़ सोशल मीडियाचा कितीही मारा झाला असला, तरी अभ्यासासाठी असणा:या या अभ्यासिकांची गर्दी मात्र किंचितही कमी झालेली नाही, हे विशेष!
महाराष्ट्रात पहिला
आलेला मुंबईकर
झोपडपट्टीत राहून दहावीला महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान पटकावणारा मंगेश म्हसकर हा देखील मुंबईचाच होता. त्यानेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जात अभ्यास करून यशस्वी झाला. त्यामुळे मुंबईकर केवळ हौसेमौजेसाठीच प्रसिद्ध आहेत, असे नसून चिकाटी दाखवून यश मिळवण्यासाठीही ओळखले जातात.
डॉ. बाबासाहेबांचा आदर्श..
देशाची राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून सामाजिक क्रांतीच घडवली नाही, तर या देशाला दिशा देण्याचे कामही केले. डॉ. बाबासाहेबांचीच प्रेरणा घेऊन आजही हजारो विद्यार्थी ज्ञानसाधनेसाठी याच रस्त्यांवरील दिव्यांचा आधार घेत आहेत.
नव्या सरकारला आवाहन
विद्यार्थी हा देशाचे भविष्य असतो, अशी ओरड राजकारणी आवजरून करीत असतात. मोठमोठय़ा घोषणाही ते करतात. पण या रस्त्यावरच्या अभ्यासिका आजही दुर्लक्षितच आहेत. तेव्हा अशा अभ्यासिकांसाठी पाणी व शौचालयांची सोय तरी प्रशासन करेल का, अशी अपेक्षा विद्याथ्र्यामधून व्यक्त होत आहे.
यशस्वी विद्याथ्र्याना आवाहन
प्रतिकूल परिस्थितीत रस्त्यावरच्या अभ्यासिकांत अभ्यास करून यशस्वी झालेल्या आजी-माजी विद्याथ्र्यानी प्रेरणादायी ठरणारे स्वानुभव ‘लोकमत’ला जरूर कळवावेत. या अनुभवांना यथावकाश प्रसिद्धी दिली जाईल. आमचा पत्ता : रस्त्यावरच्या अभ्यासिकातील यश, लोकमत मुंबई कार्यालय, दुसरा मजला, आनंद कॉम्प्लेक्स, आर्थर रोड, चिंचपोकळी, मुंबई - 11़