Join us  

मुंबईत हार्बर मार्गावर चार वेळा रेल रोको  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 4:27 AM

भीमा कोरेगाव येथील घटेनेचे प्रतिसाद मंगळवारी मुंबईच्या ‘लाईफलाईन’ वरही दिसून आले. हार्बर मार्गावर चेंबूर-गोवंडी स्थानकासह कुर्ला स्थानकात दिवसभर एकूण ४ वेळा रेल रोको करण्यात आला.

मुंबई : भीमा कोरेगाव येथील घटेनेचे प्रतिसाद मंगळवारी मुंबईच्या ‘लाईफलाईन’ वरही दिसून आले. हार्बर मार्गावर चेंबूर-गोवंडी स्थानकासह कुर्ला स्थानकात दिवसभर एकूण ४ वेळा रेल रोको करण्यात आला. परिणामी हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी-मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गाच्या लोकल पूर्णपणे ठप्प होत्या.या कारणात्सव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि मानखुर्द/वाशी-पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात आल्या. मध्यसह ट्रान्स हार्बरवरील लोकल सुरळित होत्या. लांब पल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेस ट्रेन सुरळीत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे - संजय निरुपमभीमा कोरेगाव येथे शौर्यदिनाच्या निमीत्ताने एकत्रित झालेल्यांवर मारहाण आणि त्यांच्या गाड्यांवरील दगडफेकीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे. या षडयंत्रामागे असलेल्या ज्या दोन लोकांना अटक झाली आहे, त्यांचा संघाशी आणि भाजपाशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.ते म्हणाले, भीमा-कोरेगाव येथील घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी लांच्छनास्पद घटना घडणे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.पहिला रेल रोकोचेंबूर : सकाळी ११.४४ ते दुपारी १२.०७ मिनिटेहार्बर मार्गावर गोवंडी स्थानकात सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पहिला रेल रोको झाला. भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करत नागरिकांनी रेल्वे रुळांवर धाव घेतली. त्यामुळे कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होती. रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी एकत्र येत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिणामी १२.०७ मिनिटांनी चेंबूर स्थानकाहून गोवंडीच्या दिशेने रवाना झाली.दुसरा रेल रोकोगोवंडी : दुपारी १.१५ ते २.०९ आणि २.१२ ते ३.०१दुपारी १.१५ च्या दरम्यान जमावाने पुन्हा गोवंडी येथे रेल रोको केला. या रेल रोकोमुळे अनेक लोकल गाड्या चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्दच्या दरम्यान रेल्वे रुळावर उभ्या होत्या. याकाळात एकही लोकल गाडी जागेवरुन हलली नाही. दुपारी २.०९ मिनिटांनी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरुन हटवले. मात्र पुन्हा २.१२ मिनिटांनी मोठ्या संख्येने जमाव आल्यामुळे पुन्हा रेल रोको करण्यात आला.तिसरा रेल रोकोचेंबूर : दुपारी १.५३ - ४.४२ वाजतादुपारी २ वाजेच्या सुमारास ३० ते ४० तरूणांचा जमाव चेंबूर स्थानकालगत रेल्वे रुळांवर उतरला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल रोखण्यात आली. या रेल रोकोच्या दरम्यान ५० हून अधिक पोलीस चेंबूर रेल्वे स्थानकावर हजर होते. काहीच वेळात महिला पोलिसांची एक तुकडी स्थानकावर दाखल झाली.चौथा रेल रोकोकुर्ला : ४.४६ ते ५.२०चेंबूर-गोवंडी स्थानकावरील आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरुन बाजूला केले. मात्र कुर्ला स्थानकात पुन्हा एकदा घोषणाबाजी देत जमाव रेल्वे रुळावर आला. मात्र स्थानकावर रेल्वे पोलिसांसह आरपीएफ जवानांचा फौजफाटा असल्यामुळे त्यांना रेल्वे रुळापांसून दूर करण्यात आले. अखेर कुर्ला स्थानकातून ५ वाजून २० मिनिटांनी लोकल सीएसएमटीकडे रवाना झाली.अफवांवर विश्वास ठेवू नका... मुंबई पोलिसांचे आवाहन, मुंबईतून १०० जण ताब्यातभीमा कोरगाव येथील घटनेमुळे अफवांनी चांगलेच डोके वर काढले़ परिस्थितीवर नियंत्रण आणताना पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली़ जमावावर नियंत्रण करताना चेंबुरचा एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला़ आंदोलक भीमसैनिकांपैकी १०० जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले़मुलुंडच्या टोकापासून भीम सैनिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. हातात काठी, मिर्ची पावडर घेऊन महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुलुंड रेल्वे स्टेशन परिसरात भीम सैनिकांनी बस अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून किरकोळ लाठीचार्ज केला. यामध्ये बसेसची तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली. रास्ता रोको, रेल रोको बरोबरच काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमावावर नियंत्रण करताना चेंबुर पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई दिपक खेडेकर जखमी झाले. त्या ठिकाणी गेलेल्या पत्रकार सुनील सिंहवरही हल्ला करण्यात आला. काचेची बाटली डोळ््यावर मारल्याने खेडेकर यांच्या बुबूळाला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.भीमा-कोरेगाव घटनेचा तपास सीबीआयने करावानव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीमा-कोरेगाव येथील दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे संबंधितांवर ‘एससी/एसटी प्रिव्हेन्शन अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, तसेच या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात यावे किंवा हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, यासाठी अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, गृहविभागाचे प्रधान सचिव, अतिरिक्त महासंचालक, एससी/एसटी प्रिव्हेन्शन आॅफ अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट, पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था यांना मंगळवारी कायदेशीर नोटीस बजावली आहे.मुंबईतील आंदोलनाची टाईमलाइन१०.०० : कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमध्ये आंदोलनाच्या पवित्र्यात१०.१० : मुलुंडमध्ये बस अडवण्याचा प्रयत्न११.०० : चेंबूरमधील दुकाने बंद११.३० : चेंबूर स्थानकावर घोषणाबाजी११.४४ : चेंबूरला लोकल रोखली१२.०० : चेंबूर नाक्यावर निदर्शने१२.१५ : सायन-पनवेल वाहतूक रोखली१२.३० : मुलुंड पोलीस ठाण्यावर मोर्चा१२.३२ : वनराई पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांकडून निवेदन०१.१५ : गोवंडीला लोकल अडवली०१.५३ : चेंबूरला लोकल थांबविली०२.३० : चेंबूरला लोकलवर दगडफेक०२.१२ : गोवंडीत पुन्हा लोकल रोखली०३.३० : कुर्ला-विद्याविहार-सायन शाळांना अर्धी सुट्टी०३.४५ : चेंबूरला रेल रोको०३.५७ : दादरमध्ये शाळांना अर्धी सुट्टी०४.०८ : डॉ. आंबेडकर महाविद्यालयाबाहेर निदर्शने०४.४६ : कुर्ला स्थानकात लोकलला ब्रेक०५.०४ : दादर, हिंदमाता कडकडीत बंद०५.३० : गोरेगाव एस.व्ही. मार्गवर मोर्चा०७.३० : घाटकोपर आरसी मार्ग बेस्ट बस पेटवण्याचा प्रयत्नमहामार्गावर वाहतूक कोंडीहार्बर मार्ग बंद झाल्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. कुर्ला-मानखुर्द/वाशी स्थानकादरम्यान रेल्वे पूर्णपणे ठप्प असल्याने रस्ते मार्गावर ताण आला.भीमा-कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद चेंबूर, गोंवडी या परिसरात घडले. आंदोलनकर्त्यांनी थेट रस्त्यांवर उतरुन घोषणाबाजी केली. वाहतुकीला अडथळे आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.आंदोलनकर्ते रस्त्यांवर ठाण मांडून बसले. रमाबाई नगर, छेडा नगर आणि कामराज नगरसह मानखुर्द ते एससीएलआर मार्ग, मानखुर्द ते सायन आणि एससीएलआर ते घाटकोपर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या व्यतिरिक्त शहरातील अन्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होती, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

टॅग्स :भीमा-कोरेगावमुंबईमुंबई लोकल