Join us  

शेतीमाल हमीभावासाठी ८ जानेवारीला रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 4:43 AM

नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या, जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत किसान सभेने सरकारविरोधात ८ जानेवारीला राज्यव्यापी रेल रोको व रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबई : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या, जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत किसान सभेने सरकारविरोधात ८ जानेवारीला राज्यव्यापी रेल रोको व रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. याशिवाय केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ८ व ९ जानेवारीच्या देशव्यापी संपालाही किसान सभेने पाठिंबा जाहीर केला आहे.किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सांगितले की, राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही केंद्राच्या चुकीच्या दुष्काळ संहितेमुळे शेकडो गावे दुष्काळाच्या यादीतून अन्यायकारक पद्धतीने वगळण्यात आली आहेत. दुष्काळी गावांना अद्याप कोणतीही मदत पोहचविण्यात आलेली नाही. फसवी कर्जमाफी व नाकारलेल्या विमा, बोन्ड आळी नुकसानभरपाईमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जमीन अधिग्रहणाचा कॉपोर्रेट धार्जिणा कार्यक्रम मात्र राज्यात नेटाने राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे.

सोहराबुद्दीन यांच्यासह सात जणांना कोणीच मारले नाही, ते असेच मेले? राहुल गांधीशीलेश शर्मानवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख, कौसरबी आणि तुलसी प्रजापती यांच्या एन्काऊंटर प्रकरणातील सर्व आरोपींना मुक्त करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तपास संस्थांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. एका ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘हरेन पंड्या, तुलसी राम प्रजापती, न्या. लोया, प्रकाश ठोंबरे, श्रीकांत खंडाळकर, कौसरबी आणि सोहराबुद्दीन शेख यांना कोणीही मारले नाही. हे सर्व जण असेच मरून गेले.’सूत्रांनी सांगितले की, राहुल यांच्या ट्विटमुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे. २२ आरोपींना पुराव्यांअभावी कसे सोडले? तपास संस्थांना पुरावे मिळाले नाहीत, की त्यांनी पुरावे गोळाच केले नाहीत? त्यांना कोणी तरी मारले असेलच ना? कोणीच मारले नसेल, तर हे लोक मारले गेले कसे? शुक्रवारी सुटलेले आरोपी या हत्या प्रकरणात सहभागी नव्हते, तर कोण सहभागी होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपास संस्थांना असायला हवी.सोहराबुद्धीन शेख खटल्याचा निकाल देणारे न्या. एस. जे. शर्मा यांचा हा शेवटचा खटला होता. ते आता निवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले की, पीडित परिवारांनी पुत्र-भाऊ गमावला आहे. शेख आणि प्रजापती यांच्या परिवाराबाबत मला कणव आहे. तथापि, न्यायव्यवस्था पुराव्यांच्या आधारे चालते. हे आरोपी या गुन्ह्यात सहभागी असल्याचा पुरेसा पुरावाच आपल्यासमोर आलेला नाही.सत्ताधाऱ्यांचा आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न ?या खटल्यात राजस्थान आणि गुजरातमधील पोलीस अधिकारी आरोपी होते. या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न सत्तेतील लोक का करीत आहेत, असा प्रश्न राहुल यांच्या ट्विटमुळे निर्माण झाला आहे. २२ आरोपींना पुराव्यांअभावी कसे सोडले? तपास संस्थांना पुरावे मिळाले नाहीत, की त्यांनी पुरावे गोळाच केले नाहीत? असे प्रश्न टिष्ट्वटमधून विचारले आहेत.

टॅग्स :शेतीमुंबई