Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीविरोधात रास्ता रोको

By admin | Updated: June 2, 2015 04:39 IST

गेल्या मंगळवारी बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या जासर्ईच्या तरुणाच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत मिळावी

उरण : गेल्या मंगळवारी बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या जासर्ईच्या तरुणाच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी जासई येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. या वेळी महामार्गासाठी दिलेल्या जमिनींच्या प्रलंबित राहिलेल्या मोबदल्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी, अपघात टाळण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड देण्यात यावा, दोन्ही मार्गांवरील कंटेनर वाहतुकीवर नियंत्रण ठेवून कारवाई करण्यात यावी, अशाही मागण्या करण्यात आला. महामार्गावरील या रास्ता रोकोमुळे सकाळी दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. या रास्ता रोको आंदोलनात माजी खासदार रामशेठ ठाकूूर, माजी आमदार विवेक पाटील तसेच सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचा परिणाम पाहता जेऐनपीटीतील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि या मागण्या ६ जूनपर्यंत सोडवण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले. (वार्ताहर)