Join us

वंडर पार्कमध्ये होणारी जनतेची लूट थांबवा

By admin | Updated: October 29, 2014 01:09 IST

नेरूळमधील वंडर पार्कमधील गैरसोयींविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सुविधा काहीच नसताना प्रवेश शुल्काच्या नावाखाली लूट होत आहे.

नवी मुंबई : नेरूळमधील वंडर पार्कमधील गैरसोयींविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सुविधा काहीच नसताना प्रवेश शुल्काच्या नावाखाली लूट होत आहे. उद्यानातील सर्व सुविधा पूर्ववत होईर्पयत अवाजवी शुल्क बंद करावे, अशी मागणी नाग्रिकांनी केली आहे. 
महापालिकेने 35 कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधलेल्या वंडर पार्कमध्ये असुविधा आहेत. येथील गैरसोयींविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच नागरिकांनीही तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. उद्यानामध्ये प्रवेशासाठी 35 रुपये शुल्क आकारले जात आहे. लहान मुलांकडूनही 25 रुपये घेतले जाते. खारघरमधील सेंट्रल पार्क सिडकोने नागरिकांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिले आहे. परंतु महापालिका मात्र काहीही सुविधा नसताना नागरिकांकडून अवाजवी पैसे वसूल करीत आहे. 
वंडर पार्कमधील चारही राइड व टॉय ट्रेन पावसाळ्यापासून बंदच आहे. उद्यानामधील दोन्ही कृत्रिम तलाव कोरडे पडले असून, यातील कारंजे बंद आहेत. लहान मुलांसाठी ट्रॅफिक गार्डन तयार केले आहे. या ठिकाणी सिग्नल, वाहतुकीचे सर्व नियम सांगण्याची सुविधा आहे. परंतु सदर ट्रॅफिक गार्डन अद्याप सुरूच झालेले नाही. फूड कोर्ट, वाहनतळही सुरू केलेला नाही. 
वंडर पार्कमध्ये जाणा:या नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे. येथील प्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवली जात नाही. साफसफाईअभावी प्रचंड दरुगधी असून, याविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका नागरिकांची लूट करीत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
 
खासदार निधीतील बंगल्याचा डामडौल कायम
संजीव नाईक खासदार असताना त्यांच्या निधीतून वंडर पार्कमध्ये आलिशान स्वागत कक्ष तयार केला आहे. पार्कच्या एका कोप:यात हा आलिशान बंगला उभा केला आहे. या बंगल्याकडे सर्वसामान्य नागरिकांना जाऊ दिले जात नाही. तेथे खास सुरक्षारक्षक ठेवण्यात आला आहे. उद्यानाला भेट देणा:या व्हीआयपी नागरिकांना थांबता यावे यासाठी हा कक्ष उभारला आहे. या बंगल्यामध्ये दोन बेडरूम व हॉल अशी रचना आहे. एका खोलीत एलईडी टीव्ही, सर्व खोल्यांमध्ये फोनची व्यवस्था आहे. सामान्य नागरिकांना काहीही उपयोग नसलेल्या या बंगल्याचा डामडौल कोणासाठी व कशासाठी, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. 
 
उद्यानातील टॉय ट्रेन व राइड बंद आहेत. तलाव कोरडे पडले आहेत. कारंजे बंद आहेत.  ट्रॅफिक गार्डन बंद आहे. प्रसाधनगृहांमधून प्रचंड दरुगधी आहे. वाहनतळ व फूड कोर्ट सुरू झालेला नाही. येथे पाहण्यासारखे काहीच उरलेले नाही. तीन जणांच्या प्रवेश शुल्कासाठी 95 रुपये खर्च झाला. एवढा खर्च करून पदरी निराशा आली आहे. महापालिकेने पूर्वीप्रमाणो सुविधा द्याव्या किंवा नागरिकांची लूट थांबवून सर्वाना मोफत प्रवेश द्यावा अन्यथा एक दिवस नागरिकांना याविरोधात आंदोलन करावे लागेल. 
- गणोश माने, रहिवासी, नेरूळ 
 
आयुक्तांनी घेतली झाडाझडती 
च्लोकमतने वंडर पार्कविषयी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी मंगळवारी अभियांत्रिकी विभागाची तात्काळ बैठक घेऊन अधिका:यांची झाडाझडती घेतली. यात वंडर पार्क व्यवस्थित चालविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. नागरिकांचा चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याविषयीही आयुक्तांनी सूचना केल्या आहेत. प्रशासनाने यापूर्वीच तीन वेळा वंडर पार्क चालविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या, परंतु त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. आता पुन्हा याविषयी निविदा मागविण्यात येणार आहेत. चांगल्या संस्थेकडे वंडर पार्कची जबाबदारी सोपविण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.