Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्याच्या इंटरनेटवरील थांब्याची करा चौकशी

By admin | Updated: March 10, 2015 00:20 IST

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्यावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

डोंबिवली : शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्यावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता़ त्यानुसार आश्वासनही देण्यात आले होते़ परंतु, प्रत्यक्षात मात्र गाड्या थांबल्याच नाहीत. तरीही इंटरनेटवर सीएसटी - करमाळा गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते़ त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल झाल्याची टीका करून त्यांनी याची चौकशी करावी असे पत्र त्यांनी महाव्यवस्थापकांना पाठवले. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन त्यांनी तातडीने हा पत्रव्यवहार करून प्रवाशांना त्रास झालाच कसा असा सवाल केला. सोमवारच्या मुंबई लोकल या रेल्वेच्या विशेष पानावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तरमुळे रेल्वेचा भोंगळ कारभार कसा असतो याची प्रचिती आली, त्याची खंत वाटते.