मुंबई : मालकाच्या घरी बनविलेल्या जेवणात विष घातल्याप्रकरणी अटक केलेल्या संतोषकुमार उर्फ सीडीओ बिकाऊ राऊत (२२) याला १ मार्चपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्या या कृत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे खार पोलिसांनी सांगितले. पत्रकार धर्मेश ठक्कर यांच्या घरी बुधवारी राऊतने बनविलेल्या जेवणात धत्तुराच्या बियांची पावडर घातल्याने ठक्कर कुटुंबीयांतील तिघे अत्यवस्थ झाले होते. मात्र वेळीच त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने ते बचावले. या प्रकरणी फरारी असलेला नोकर राऊत याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अशा तऱ्हेने विषप्रयोग करण्यामागे आरोपी राऊत याचा नेमका कोणता उद्देश होता, याची चौकशी करण्यात येणार असून या कटात त्याचे आणखी काही साथीदार सहभागी होते का, याचाही छडा लावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जेवणात विष घालणाऱ्या नोकराला कोठडी
By admin | Updated: February 28, 2016 03:36 IST