Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजार सावरला

By admin | Updated: September 18, 2014 02:38 IST

गेल्या दोन दिवसांतील घसरणीतून भारतीय शेअर बाजार बुधवारच्या सत्रत सावरला

मुंबई : गेल्या दोन दिवसांतील घसरणीतून भारतीय शेअर बाजार बुधवारच्या सत्रत सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 138.38 अंकांनी ङोपावत दिवसअखेर 26,631.29 वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक  (निफ्टी) 42.6क् अंकांनी वधारत 7,975.5क् वर स्थिरावला.
अमेरिकी फेडरल रिझव्र्ह आर्थिक वृद्धीला गती देण्यासाठी व्याजदर कमी ठेवील, तसे चीनची मध्यवर्ती बँकही मोठय़ा बँकांना नव्याने कर्ज देण्याची शक्यता असल्याने भारतीय बाजाराला पाठबळ मिळाले, असे बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले. गुंतवणूकदारांनी निवडक आणि बडय़ा कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी केली. मुंबई शेअर बाजार निर्देशांक 12 पैकी 1क् क्षेत्रतील कंपन्यांचे शेअर्स फायद्यात राहिले. शेअर बाजाराच्या प्राथमिक आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी 828.95 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 465.61 कोटी रुपयांचे शेअर्स  खरेदी केले. जपानवगळता आशियातील अन्य बाजारातही तेजी राहिली. युरोपियन बाजारही सुरुवातीला चढावावर होता.