Join us  

अजूनही ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:12 AM

अकरावीची विशेष फेरी; ३८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्याची गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर झाली. या फेरीत ३८,५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र अजूनही सुमारे ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. दरम्यान, विशेष फेरीमध्ये महाविद्यालयांचा कटआॅफ २ ते ३ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.पहिल्या चार फेºयांमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, महाविद्यालयांकडून काही कारणास्तव प्रवेश नाकारण्यात आलेले, यादीत नाव येऊनही प्रवेश निश्चित न केलेले तसेच आधीच्या फेºयांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी अशा ४७,४६७ विद्यार्थ्यांसाठी ही विशेष फेरी होती. यात १८,६९९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, तर ७,३३३ विद्यार्थ्यांना दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. २,२२४ विद्यार्थ्यांना कला, २,७८२ विद्यार्थ्यांना वाणिज्य तर ८,७३४ विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेसाठी प्रवेश मिळाला.२१ आॅगस्टपर्यंत मुदतप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २१ आॅगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत असून, त्यानंतर प्रथम येणाºयास प्राधान्य या तत्त्वावर ही फेरी घेण्यात येईल. या फेरीसाठी अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी लवकरच ते जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.

टॅग्स :महाविद्यालयविद्यार्थी