ठाणे : नशेसाठी वापर होणारी ट्रानॅक्स एक आणि रेक्सकॉफ कफ सिरप ही औषधे ठाण्यात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आलेल्या भिवंडी, दिघाशी रोड येथील सुलेमान साठे (५३) याला अटक झाली. ही कारवाई बुधवारी ठाणे अमली पदार्थविरोधी पथक आणि अन्न प्रशासन विभागाने प्रथमच संयुक्तरीत्या केली आहे. त्याच्याकडून ६४ हजारांचा औषधांचा साठा जप्त केला आहे. सुलेमान हा व्यापारी असल्याचे तपासात समोर आले आहे.
नशेची औषधे विकणा-यास अटक
By admin | Updated: August 29, 2014 00:32 IST