Join us
Daily Top 2Weekly Top 5

झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:45 IST

झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात लाखोंची घरफोडी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

मुंबई : झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात लाखोंची घरफोडी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस तपास करत आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरातील रहिवासी व्यावसायिक गुलवालेचा (५२) यांचा झवेरी बाजारातील मिर्झा स्ट्रीटवर सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. लुटारूंनी ४२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्यांसोबतच दागिने पॉलिश करून आलेला १५ ग्रॅम वजनाचा कीस असा एकूण १ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला होता.

टॅग्स :दरोडा