Join us

आयडॉलॉजिकल करोनाच्या विरोधात राष्ट्र सेवा दलाची राज्यव्यापी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST

चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन : गाव तिथे संविधान घर !लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या निर्मात्यांनी ज्या ...

चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन : गाव तिथे संविधान घर !

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशाच्या निर्मात्यांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांना गेल्या काही वर्षांमध्ये तडा जात आहे. देशात करोनाचे संकट आहे, तितकेच संकट वैचारिक (आयडॉलॉजिकल) काेरोनाचे वाढले आहे. त्याविरुद्ध लढण्यासाठी देशातील सर्व न्याय संविधानप्रिय पक्ष, संघटना आणि नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाने केले आहे.

शेतकरी, कामगारविरोधी व द्वेषाचे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारविरुद्ध एकजुटीसाठी राज्यव्यापी ‘गाव तेथे संविधान घर’ राज्यव्यापी मोहीम राबवणार आहे. सेवादलाच्या या मोहिमेला महाराष्ट्रातील गावा गावातील, शहरा शहरातील प्रत्येक संवदेनशील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी, बाबा आढाव, प्रकाश आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो, भालचंद्र मुणगेकर, झहीर काझी, भालचंद्र कांगो आदी विविध क्षेत्रातील ४० ज्येष्ठ मंडळींनी जनतेला केले आहे.

या मंडळींनी राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून आवाहन केले आहे की, देशात सध्या आरोग्य सुविधांच्याअभावी माणसे मरत आहेत. गंगेच्या प्रवाहात सोडलेल्या प्रेतांनी ती ‘शववाहिनी’ बनली आहे. धर्मद्वेषाच्या नावावर विष कालवले जात आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांचे जीवन दुष्कर बनले आहे. शेतकरी बेजार आहे. प्रवासी मजुरांचे हाल होत आहेत. वंचित, उपेक्षितांच्या रेशनचा पत्ता नाही. तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. शाळा-कॉलेज बंद आहेत. ३५ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या बाहेर आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी आणि शेतकरी समाजात प्रचंड असंतोष आहे. आरक्षणाचा अधिकारच हिरावून घेतला जाईल काय? अशी भीती त्याला वाटत आहे. अल्पसंख्य समुदाय कधी नव्हे इतके असुरक्षित झाले आहेत. या स्थितीत देशातील सर्व न्यायप्रिय जनतेने एकत्र आले पाहिजे. कधी नव्हे इतक्या एकजुटीची आज गरज आहे. म्हणूनच आपल्या लोकशाही अधिकारांसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक होण्याचे आवाहन आम्ही सेवा दल आणि सर्व समविचारी प्रवाह एकत्र येऊन करत आहोत. आयडॉलॉजिकल करोनाने दुभंगलेला समाज जोडण्यासाठी, गावोगावी, शहरातील वॉर्डमध्ये जिथे सर्वांना एकत्र येता येईल.

.................................