Join us  

किरीट सोमय्यांचा नवा व्हिडीओ व्हायरल, सेनेविरुद्ध वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:55 AM

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या अर्धवट वाक्याचा वापर करून तयार केलेला व्हिडीओ चर्चेत असताना, गुरुवारी सोमय्यांचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल झाला.

मुंबई : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या अर्धवट वाक्याचा वापर करून तयार केलेला व्हिडीओ चर्चेत असताना, गुरुवारी सोमय्यांचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात मातोश्रीसह उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंवर केलेल्या आरोपांना एकत्र करत, पुढे भाजप उमेदवार त्याच पावलांवर पाऊल ठेवणार असल्याचे दाखवले. यावरून उत्तर पूर्व मुंबईत नाराज शिवसैनिकांच्या मतांसाठी भावनिक खेळीचा आधार घेतल्याचे चित्र दिसते आहे.सोमय्या यांनी भ्रष्टाचाराची होळी, दहीहंडी करत, थेट मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यातून शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला. त्यात भाजपचे जितेंद्र घाडीगावकर आदी कार्यकर्ते जखमी झाले होते. हल्लेखोरांमध्ये बहुतांश भांडुपचे कार्यकर्ते होते. तिथूनच सोमय्या विरुद्ध सेना असा वाद सुरू झाला. युतीनंतर उत्तर पूर्व मुंबईतून सोमय्या यांचा पत कट झाला असला तरी, काही शिवसैनिकांमध्ये अजूनही तो राग कायम होता.याच दरम्यान सेना आमदार सुनील राऊत आणि अशोक पाटील यांनी तर एका बिगर राजकीय समारंभात महाआघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांना भावी खासदार घोषित केले. यावरून दोघांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले.>राष्ट्रवादी प्रचारापेक्षा अपप्रचाराचा आधार घेऊन षड्यंत्र करत आहे. त्यात त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही. आमच्याकडे विकासाचा अजेंडा असल्याने आम्ही सकारात्मक प्रचार करत आहोत आणि करत राहणार.- मनोज कोटक, भाजप उमेदवारसत्य लपत नाही. मतदारांच्या असलेल्या रागातून या गोष्टी घडत आहेत. त्यात आमचा काहीही संबंध नाही. कुठेतरी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी कुठलीही घटना घडल्यास ती आमच्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. आमच्यावर मतदारांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला अशा अपप्रचाराची आवश्यकता नाही.- संजय पाटील, आघाडी उमेदवार

टॅग्स :किरीट सोमय्यामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019