Join us  

राज्यात दिवसभरात 3,959 कोरोनाबाधित, रिकव्हरी रेट वाढला

By महेश गलांडे | Published: November 07, 2020 10:07 PM

देशातील कोरोना महामारीचं संकट कमी होताना दिसत असून सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रातही कोरोनाचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

मुंबई - राज्यात तब्बल सात महिन्यांनंतर आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. राज्यात शुक्रवारी एकूण 3959 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 150 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज दिवसभरात 6748 रुग्णांनी डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. आजही राज्यात एक्टीव्ह कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 99,151 एवढी आहे. मात्र, कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर गेला आहे.

देशातील कोरोना महामारीचं संकट कमी होताना दिसत असून सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रातही कोरोनाचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17,14, 273 वर पोहोचली आहे. त्यापैकी 15,69,090 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 45,115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. तर, गुरुवारी राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ५,२४६ रुग्णांचे निदान झाले असून ११७ मृत्यूंची नोंद झाली होती.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र