Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुबारक बेगम यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार

By admin | Updated: May 13, 2016 03:43 IST

प्रख्यात गायिका मुबारक बेगम यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

मुंबई : अंधेरीच्या महापालिकेच्या ‘बीएसईएस’ रुग्णालयात दाखल असलेल्या प्रख्यात गायिका मुबारक बेगम यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली. ३ मे रोजी बेगम यांना रुग्णालयात दाखल केले होते. प्रख्यात गायिका मुबारक बेगम या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सात दिवस उलटूनही राज्य सरकारला याची काहीच कल्पना नव्हती. गुरुवारी सकाळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिक विभागाचे प्रभारी संचालक संजय पाटील यांनी मुबारक बेगम यांची भेट घेतली. त्या वेळी रुग्णालयात मुबारक बेगम यांची सून झरिना शेख आणि नात सना शेख उपस्थित होत्या. या दोघींशी पाटील यांनी चर्चा केली. (प्रतिनिधी)