Join us  

CoronaVirus News: लोकल प्रवास बंद करण्याचा विचार - विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:12 AM

लोकल पूर्ण बंद करावी की पूर्वी जसे कठोर निर्बंध घातले होते तसे पुन्हा घालावेत, यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लोकल प्रवास बंद करण्याचा किंवा लोकल प्रवासावर निर्बंध आणण्याच्या विचारात असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिली.कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात विशेषतः लोकल रेल्वे गाड्यातील गर्दी कमी होत नसल्याने त्यावरही निर्बंध आणण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, सर्वसामान्यांचा रोजगार बुडत असल्याचे लक्षात  घेऊन लोकल सर्वांसाठी खुली करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबई आणि परिसरात ज्या वेगाने करोना रुग्ण वाढत आहेत ते पाहता लोकलमधील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यातूनच लोकल पूर्ण बंद करावी की पूर्वी जसे कठोर निर्बंध घातले होते तसे पुन्हा घालावेत, यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई लोकलविजय वडेट्टीवार