Join us  

राज्य सरकार मच्छिमारांच्या पाठिशी; सुभाष देसाई यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 4:57 PM

शेतकऱ्यांप्रमाणे नैसर्गिक अडचणीत असलेल्या मच्छिमारांचा ओळा दुष्काळ जाहीर करून अर्थिक मदत करावी.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: राज्य सरकार मच्छिमारांच्या पाठिशी असून वादळ व अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्ती मुळे मच्छिमारांचे झालेल्या नुकसानी बाबत सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांची मुबईत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस, किरण कोळी यांच्या अध्यक्षतेखाली  समितीच्या शिष्टमंडळाला दिले. आज सकाळी समितीने राज्याचे मंत्री सुभाष देसाई व जयंत पाटील यांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी सदर आश्वासन दिले.

शेतकऱ्यांप्रमाणे नैसर्गिक अडचणीत असलेल्या मच्छिमारांचा ओळा दुष्काळ जाहीर करून अर्थिक मदत करावी. मच्छिमारांचे सरसकट व्याजासह कर्ज माफ करावे, डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कर परतावा तात्काळ आदा करावा अश्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्याना देण्यात आले.

सुभाष देसाई यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी कालच संबंधित अधिकाऱ्यांना कोकणातील शेतकरी व मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार मच्छिमारांना नक्की मदत करेल तसेच लवकरच राज्यातील मच्छिमारांच्या प्रलंबित प्रश्नांबात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिल्याची माहिती किरण कोळी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांची देखिल भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी वरील गंभीर स्थिती बाबत ज्ञात असल्याचे सांगितले. व लवकरच संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना मदत  मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळात सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष मोरेश्र्वर पाटील, मुंबई अध्यक्ष परशुराम मेहेर,जयेश भोईर, भुवनेश्वर धनु, मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटी लि. चे अध्यक्ष भास्कर तांडेल उपस्थित होते.

टॅग्स :सुभाष देसाईमच्छीमारशिवसेना