Join us  

राज्यात दिवसभरात १०,२२१ रुग्ण कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 6:13 AM

८ हजार ९६८ नव्या रुग्णांची नोंद : बाधितांची संख्या साडेचार लाखांहून अधिक

मुंबई : राज्यात सोमवारी कोरोनाचे ८ हजार ९६८ रुग्ण आढळले तर २६६ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५० हजार १९६ झाली असून मृतांचा आकडा १५ हजार ८४२ झाला आहे. दिवसभरात १०,२२१ रुग्ण कोविडमुक्त झाले. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर राज्यातील ग्रामीण भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, मुंबईनजीकच्या ठाणे, रायगड शहरांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. हीच परिस्थिती नाशिक, औरंगाबाद, धुळे आणि सांगली जिल्ह्यांतील ग्रामीण भागातही आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के झाले असून मृत्युदर ३.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ८७ हजार ३० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या २६६ मृत्यूंमध्ये मुंबई ४६, ठाणे ५, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा ७, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा ४, भिवंडी-निजामपूर मनपा २, मीरा-भार्इंदर मनपा २, वसई-विरार मनपा ३, रायगड ३, पनवेल मनपा २, नाशिक ३, नाशिक मनपा ३, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, धुळे १, जळगाव ६, नंदुरबार ४, पुणे ७, पुणे मनपा ४०, पिंपरी-चिंचवड मनपा १३, सोलापूर ४, सोलापूर १, सातारा १, कोल्हापूर ५, कोल्हापूर मनपा ४, सांगली ४, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ५, रत्नागिरी २, औरंगाबाद मनपा ३, जालना १, लातूर ५, लातूर मनपा २, उस्मानाबाद १, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा ४, अकोला १, अकोला मनपा १, अमरावती २, यवतमाळ २, वाशिम १, नागपूर ९, नागपूर मनपा ४१ आणि अन्य राज्य व देशातील तीन रुग्णांचा समावेश आहे.सध्या राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ३७ हजार ९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सोमवार सकाळच्या अहवालानुसार, राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतचे १७ हजार १५५, ११ ते २० वयोगटातील ३० हजार ५० रुग्ण आहेत. २१ ते ३० वयोगटातील ७५ हजार ७९५ , ३१ ते ४० वयोगटातील ८९ हजार ३३१ रुग्ण आहेत.मुंबईच्या तुलनेत ठाणे, पुण्यात सक्रिय रुग्ण अधिकमुंबईत आतापर्यंत ९० हजार ८९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत, तर सध्या २० हजार ५२८ सक्रिय रुग्णांवर विधि रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाणे, पुण्यात सक्रिय रुग्णसंख्या अधिक असल्याचे समोर आले असून ती अनुक्रमे ३२ हजार १९१ आणि ४१ हजार ६६४ इतकी आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.५८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहॉस्पिटल