Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्ती वेतन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:06 IST

मुंबई : सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्याला कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करा अशा सूचना राज्यातील विभाग नियंत्रकांनी आगार प्रमुखांना दिल्या आहेत. ...

मुंबई : सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्याला कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करा अशा सूचना राज्यातील विभाग नियंत्रकांनी आगार प्रमुखांना दिल्या आहेत. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची विविध माहिती भरून घेण्यात यावी अशा सूचना आगार प्रमुखांना दिल्या आहेत.

सेवानिवृत्त झालेल्या ११ हजार ८०० कर्मचाऱ्यांचा हिशेब एसटी मंडळाने अद्याप पूर्ण केलेला नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांना एसटी महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. राज्य सरकारकडून निधी मिळाल्यावरच या कर्मचाऱ्यांचे सुमारे १८५ कोटी रुपये देण्यात येतील, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळातून २०१८ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप कोणतीही देयके मिळालेली नाहीत. त्यातील रजा रोखीकरण आणि एकतर्फी वेतनवाढीतील फरक तरी तातडीने मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ताही अद्याप मिळालेला नाही.