मुंबई : स्वाइन फ्लूचा संसर्ग प्राथमिक पातळीवर असल्यास तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. एक-दोन दिवस लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा औषधोपचार वेळीच सुरू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वाइनचा संसर्ग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरांनी सरसकट सर्वांच्या तपासण्या करू नयेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. मुंबईसह राज्यात फैलावत असलेल्या स्वाइन फ्लूला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी स्वाइन फ्लूसंदर्भात काही विषयांवर चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक झाली. (प्रतिनिधी)
स्वाइनवर ताबडतोब औषधे सुरू करा
By admin | Updated: September 2, 2015 02:53 IST
इन फ्लूचा संसर्ग प्राथमिक पातळीवर असल्यास तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. एक-दोन दिवस लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी
स्वाइनवर ताबडतोब औषधे सुरू करा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}