Join us

स्टार ११९०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार वाढल्याचे दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यूचे प्रमाण अधिक असते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार वाढल्याचे दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यूचे प्रमाण अधिक असते. मागील दीड वर्षांपासून मुंबईकर कोविड रुपी संकटाचा सामना करीत आहे. त्या काळात साथीच्या रुग्णसंख्येत घट दिसून येत होती. मात्र, यावर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत आहे. या आजाराचे वाहक असलेल्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी कीटकनाशक विभागामार्फत मोहीम राबवली जाते. तरीही यंदा वरळी - प्रभादेवी, परळ या गिरण परिसरात अशा आजाराचा फैलाव अधिक आढळून आला आहे.

सध्या उपचार घेतलेले रुग्ण (१ जानेवारी ते सप्टेंबर)

डेंग्यू - ३०५

मलेरिया - ३६०६

लेप्टो - १५१

रोज किमान दहा रुग्ण..

मुंबईत पावसाळ्यात साथीच्या रुग्णांची संख्या वाढते. यामध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो अशा आजारांचे प्रमाण अधिक असते. सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे ३१३ रुग्ण आढळून आले आहेत.

काय आहेत लक्षणे?

मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या आजरांची लक्षणे थोड्याफार फरकाने सारखीच असतात. त्यामुळे काही वेळा निदान होण्यास वेळ लागतो. अशी आहेत लक्षणे...

डेंग्यू - उच्च ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, अंगावर चट्टे उठणे अशी लक्षणे आहेत. तर गंभीर परिस्थितीत अतिरक्तस्राव होते.

मलेरिया - मलेरियाचा वाहक असलेल्या डासांनी चावल्यानंतर काही दिवसांनंतर रुग्णाला ताप येण्यास सुरुवात होते. ठराविक वेळेतच त्या रुग्णाला ताप भरून येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे आढळून येतात.

लेप्टो - थंडी, ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या होणे, डोळे लाल होणे.

जिल्हा शल्य चिकित्सकांचा कोट...

मलेरिया, डेंग्यू रुग्णांची संख्या यावर्षी नियंत्रणात आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी पालिकेमार्फत पूर्ण खबरदारी घेतली जाते.

- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)