जव्हार : जव्हार अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात टेक्निकल सर्व्हेअर ग्रेडचे वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचारी ३० जानेवारी पासुन बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील बहुतांश कामे खोळंबली आहेत. अनेक नागरीक व शहरी बांधव रोज जमिनीच्या कामाकरीता नकाशे, उतारे, मोजणी अशी विविध कामे घेऊन येत आहेत. मात्र कार्यालयात फक्त अधिक्षक भूमी अभिलेख अधिकारीच उपलब्ध आहेत. एकही कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे, गेल्या पाच दिवसांपासुन कार्यालय ओस पडले आहे. गरीब आदिवासी जनता पदरमोड करीत भाडे खर्चून जव्हारला येतात. त्यांची कामे होत नसल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत. कर्मचा-यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे हा संप पुकारण्यात आला असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली.
जव्हारमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी संपावर
By admin | Updated: February 3, 2015 23:25 IST