Join us  

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल! आजही होणार त्रास? वेतनासाठी १५ कोटींच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 6:20 AM

घोषित वेतनवाढ मान्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एसटीच्या २५ हजार फे-या त्यामुळे रद्द झाल्या. शुक्रवारी १५ कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले.

- महेश चेमटेमुंबई : घोषित वेतनवाढ मान्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एसटीच्या २५ हजार फे-या त्यामुळे रद्द झाल्या. शुक्रवारी १५ कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले.प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी व स्कूल बसना वाहतुकीची परवानगी दिली गेली. संप मोडण्यासाठी कर्मचाºयांची धरपकड करण्यात आली. संघटनेने ५ जूनला दिलेल्या पत्राची एसटी प्रशासनाने दखल घेतलेली नाही. चर्चेद्वारे तोडगा काढल्यास सध्याच्या ४ हजार ८४९ कोटींच्या पॅकेजमध्ये कर्मचाºयांना अधिक वेतन मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने पुढे यावे, असे एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले.संघटनांचा दावा250आगार३० टक्केफेºया सुरू80आगारवाहतूक पूर्णत: बंद145आगारवाहतूक अंशत: सुरूमहामंडळाचा दावामुंबईसह सहा विभागांतील २८० मार्गावरील ३५,२४९ बस फेºयांपैकीदु. ४ वाजेपर्यंत १०,३९७ फेºया झाल्या- कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यात संपाचा मोठा फटका बसला. मराठवाडा व विदर्भात ६० टक्के वाहतूक सुरू होती.संपाबाबत कोणत्याही संघटनेने अधिकृत पत्र दिलेले नाही. काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर राहिले. या पद्धतीने प्रवाशांना वेठीला धरणे गैर आहे. वेतनकरार मान्य नसेल, तर औद्योगिक न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला अहे.- दिवाकर रावते, परिवहन मंत्रीकोणत्याही संघटनेने संपाची नोटीस दिली नसताना एसटी कामगार रस्त्यावर उतरला. त्यातूनच वेतनवाढीबाबत त्यांच्यात किती असंतोष आहे, हे लक्षात येते.- हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

टॅग्स :एसटी संपराज्य परीवहन महामंडळ