Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मदतीला एसटी आली धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:43 IST

मागील काही महिन्यांपासून वर्क फ्रॉम सुरू असले तरी प्रत्यक्षात विद्यापीठातील अनेक कामे अडकून पडली आहेत.

सीमा महांगडेमुंबई : मुंबई विद्यापीठात काम करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपनगरातून आणि दूरच्या ठिकाणांहून ने-आण करण्यासाठी एसटी बसेसच्या फेºया सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठांमध्ये सध्या परीक्षांची, निकालांची कामे, प्रमाणपत्र देणे अशा कामांना पुन्हा वेग आला आहे.विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. मात्र विद्यापीठाचे अनेक अधिकारी कर्मचारी कल्याण, विरार, पनवेल अशा ठिकाणांहून येत असल्याने आणि सद्यस्थितीत वाहतूक सेवा सुरळीत नसल्याने विद्यापीठाच्या फोर्ट आणि कालिना संकुलात पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि अधिकारी / कर्मचाºयांची सुरक्षितता लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून विद्यापीठातील कर्मचारी / अधिकारी वर्गाला एसटी सेवेच्या मदतीचा हात देण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून वर्क फ्रॉम सुरू असले तरी प्रत्यक्षात विद्यापीठातील अनेक कामे अडकून पडली आहेत.या सगळ्या कामांना विद्यापीठाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून सुरुवातीची गरज आहे. मात्र सद्यस्थितीत उपनगरातील दूरच्या ठिकाणांहून येणाºया अधिकारी व कर्मचाºयांसमोर विद्यापीठापर्यंत पोहोचायचे कसे, हा मूळ प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच सुरक्षितता आणि आरोग्य जपायचे असल्याने अजूनही अनेक अधिकारी आणि कर्मचारी कामावर येण्यास धजावत नाहीत. मात्र आता राज्यात पुन:श्च हरिओम सुरू झाले असून अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठातील कामे थोड्या मनुष्यबळात पूर्वपद्धतीने सुरू होण्यासाठी सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे व प्रवीण पाटकर तसेच प्रभारी कुलसचिव विनोद पाटील यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याकडे निवेदन केले होते.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी या हेतूने अनिल परब यांच्याकडून या निवेदनाला मान्यता देण्यात आली असून कर्मचाºयांच्या कार्यालयाच्या वेळांप्रमाणे एसटी बसेसची सुविधा त्यांना देण्यात आली आहे. अनेक कर्मचारी जे विरार, कल्याण, पनवेल स्थानकांपासून दूर किंवा इतर ठिकाणाहून उपस्थित राहणार आहेत अशा पुरुष अधिकारी व महिला कर्मचाºयांसाठी मुंबई विद्यापीठाकडून कालिना संकुलात विद्यार्थी वसतिगृह, शिक्षक भवन तसेच सावित्रीबाई फुले वसतिगृह येथे विनाशुल्क वास्तव्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी दिली. तसेच जे अधिकारी/कर्मचारी फोर्ट परिसरात उपस्थिती दर्शविणार आहेत त्यांच्यासाठी जे. एस. हॉस्टेल व मादाम कामा वसतिगृह येथे वास्तव्याची सोय करण्यात आली असल्याचे कारंडे यांनी सांगितले. या वास्तव्यसाठी त्यांना विभागप्रमुख आणि वसतिगृहाच्या अधिकाºयांना केवळ पूर्वसूचना द्यावी लागणार आहे.>विनाशुल्क होणार व्यवस्थापुरुष अधिकारी व महिला कर्मचाºयांसाठी मुंबई विद्यापीठाकडून कालिना संकुलात विद्यार्थी वसतिगृह, शिक्षक भवन तसेच  सावित्रीबाई फुले वसतिगृह येथे विनाशुल्क वास्तव्याचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी दिली. तसेच जे अधिकारी / कर्मचारी फोर्ट परिसरात उपस्थिती दर्शविणार आहेत त्यांच्यासाठी जे. एस. हॉस्टेल व मादाम कामा वसतिगृह येथे वास्तव्याची सोय करण्यात आली.